| Pimpri Chinchwad, Pune
Breaking
🚩 ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी विसाव्यावरून वाद पेटला ! १३ एप्रिलला होणार मोठा निर्णय....  • 

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी विसाव्यावरून वाद पेटला ! १३ एप्रिलला होणार मोठा निर्णय....

A
Admin
March 31, 2026
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार आहे. मात्र, यंदा पुण्यातील मुक्कामाच्या जागेवरून नवा वाद निर्माण झाला असून, यावर अंतिम निर्णय येत्या १३ एप्रिल रोजी घेतला जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असते. मात्र, वाढती गर्दी आणि मंदिरातील अपुरी जागा यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पर्यायी जागेचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, यावरून वारकरी संप्रदायात मतभेद पाहायला मिळत आहेत.

आळंदी देवस्थानने या वादावर पडदा टाकण्यासाठी १३ एप्रिल रोजी विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिंडी समाज प्रतिनिधी, सेवेकरी आणि मानकरी,देवस्थानचे विश्वस्त हे सर्व उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीत पुण्याच्या मुक्कामाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतरच आळंदी ते पंढरपूर असा संपूर्ण पालखी सोहळ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती आज आळंदी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. 
Advertisement