पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील दापोडी पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीस गेलेले ५० मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
या मोबाईलची अंदाजित किंमत पाच लाख रुपये आहे. दापोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणांहून हे चोरीचे मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
हस्तगत केलेले सर्व ५० मोबाईल फोन त्यांच्या मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. आपला गमावलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी दापोडी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
