रायगड
मराठी संगीत क्षेत्रात सध्या नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. याच प्रयोगांचा एक भाग म्हणून उदयोन्मुख गायिका सृष्टी बद्रीके तिचे पहिले मराठी ओरिजिनल गाणे ‘कविता’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, हे मराठीतील पहिले ‘ड्रम अँड बेस’ शैलीतील गाणे असल्याचे सांगितले जात आहे.
या गाण्याचे शब्द मनीष थोरवे, सृष्टी बद्रीके आणि ऋषिकेश जाधव यांनी लिहिले असून, गाण्याचे दिग्दर्शनही ऋषिकेश जाधव यांनीच केले आहे. गाण्याचे चित्रीकरण विवेक पाटील आणि राज जायतकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे.
सृष्टी बद्रीके व्यक्त करताना म्हणाली की, “आतापर्यंत माझ्या सोशल मीडियावरील कंटेंटला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. हे माझे पहिले ओरिजिनल गाणे असून ते माझ्यासाठी खूप खास आहे. ज्याप्रमाणे माझ्या कामाला तुम्ही साथ दिली, तशीच साथ या गाण्यालाही द्याल, अशी मला खात्री आहे.”
या गाण्याचा लॉंच सोहळा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. उद्या पायटा रिसॉर्ट, रोहा येथे या गाण्याच्या सेलिब्रेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण टीम आणि चाहत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

