श्री. बन्सी आटवे यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’; पुणे येथील दिमाखदार सोहळ्यात गौरव !
Main Admin/May 26, 2026, 04:12 PM IST
Article link copied
पिंपरी-चिंचवड: क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री. बन्सी आटवे यांना यंदाचा प्रतिष्ठित 'लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर स्पोर्ट्स अँड सोशल वर्क' (जीवनगौरव पुरस्कार) प्रदान करण्यात आला आहे.
साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल फिल्म, बिझनेस अँड सोशल वर्क अवॉर्ड २०२६’ आणि ‘१०० ब्रिलियंट स्टुडंट्स अवॉर्ड’ या भव्य सोहळ्यात त्यांना हा सन्मान देण्यात आला.
हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी नटसम्राट निळू फुले हॉल, पिंपळे गुरव, पुणे येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा बहुमान
या कार्यक्रमामध्ये चित्रपट, व्यवसाय, शिक्षण, समाजकार्य, क्रीडा आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच, नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बिरेन दवे, योगेश गोंधळे आणि सुनील हिरूरकर यांच्या शुभहस्ते श्री. बन्सी आटवे यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल ‘लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स फॉर स्पोर्ट्स अँड सोशल वर्क’ देऊन गौरविण्यात आले.
दिग्गजांची मांदियाळी
या सोहळ्याला चित्रपट अभिनेत्री स्पेंटा पटेल आणि डॉ. भावना मंगेश यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाझिम शेख, प्रमोद शिंदे, सागर जाधव, डॉ. मदन कोथुळे, प्रा. डॉ. वृशाली रंधीर आणि उषा भालेराव यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विजेत्यांचे कौतुक केले.
क्रीडा आणि समाजसेवेचा समतोल राखत श्री. बन्सी आटवे यांनी केलेल्या दीर्घ कार्याच्या या गौरव बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.