फुरसुंगीमध्ये कामाच्या अतिरेकी तणावातून तरुणाची आत्महत्या; संस्थाचालकावर गुन्हा दाखल
Article link copied
पुण्यातील फुरसुंगी परिसरात एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'श्री साई सेवाभावी संस्था' संचालित खुले निवारागृहात काम करणाऱ्या अतुल अंकुश लाळगे याने २२ जून २०२६ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्या विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार आणि अतुलचे चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अतुल गेल्या अडीच वर्षांपासून या संस्थेत काम करत होता. अतुलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, अतुलवर केवळ कामाचा अतिरेकी ताणच नव्हता, तर त्याला कमी पगारात संस्थेची सर्व कार्यालयीन आणि संस्थाचालकाची वैयक्तिक कामे करण्यास भाग पाडले जात होते. तसेच, संस्थेतील काही त्रुटींसाठी अतुललाच जबाबदार धरून त्याला सतत शिवीगाळ करणे आणि 'तुला कामावरून काढून तुझे करिअर बरबाद करेन' अशी धमकी दिली जात होती. या सततच्या मानसिक त्रासाला आणि अपमानाला कंटाळून अतुलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. सध्या फुरसुंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement Slot