स्त्रीशक्तीचा जागर ! श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘समर्थ नवदुर्गा पुरस्कार’ व भव्य दांडिया उत्साहात संपन्न
Article link copied
खालुंब्रे : भावी पिढीला महिलांच्या कर्तृत्वातून प्रेरणा मिळावी आणि समाजात स्त्री सन्मानाची संस्कृती अधिक दृढ व्हावी, या उदात्त उद्देशाने श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, खालुंब्रे येथे ‘समर्थ नवदुर्गा पुरस्कार’ व महिला पालकांसाठी भव्य दांडिया उत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या ९ गगनभरारी घेणाऱ्या महिलांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. हा विशेष उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारे आणि सचिव सौ. विद्याताई गवारे यांच्या मार्गदर्शक संकल्पनेतून व प्रेरणेतून साकारण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात झाली. श्री. सुरज सोमवंशी सर यांनी सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या बहारदार कवितेच्या ओळींनी प्रास्ताविकाची सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकली. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करत या पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका प्रभावीपणे मांडली.

विविध क्षेत्रांतील ९ ‘समर्थ नवदुर्गां’चा गौरव
आपल्या अथांग परिश्रमाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या खालील नऊ महिलांना यंदाचा ‘समर्थ नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले:
सौ. माया परम सिंग ठाकूर (हॉटेल व्यावसायिक)
सौ. सुष्मिता ऋषिकेश गाडे (डॉक्टर, गुरुदत्त क्लिनिक)
सौ. छाया सुभाष पवार (प्राध्यापक)
सौ. सुकन्या सचिन पवार (पोलीस दल)
सौ. प्राची जयंत शिंदे (ब्युटी पार्लर व्यावसायिक)
सौ. अश्विनी रविराज गाडे (कोचिंग क्लासेस)
श्रीमती कल्पना सोमनाथ मोरे (सार्थक साडी सेंटर)
सौ. नंदा संतोष तुळवे (अंगणवाडी शिक्षिका)
सौ. सोनल अविनाश बोत्रे (श्रुती आर्ट्स मूर्ती कारखाना)
महिला पालकांसाठी दांडियाचा उत्साह अन् बक्षीस वितरण
पुरस्कार सोहळ्यानंतर महिला पालकांसाठी विशेष दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर महिलांनी दांडियाचा आनंद लुटला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली:
बेस्ट ऑल राउंडर: देवी देवासी
बेस्ट परफॉर्मर: पूजा पवार, हर्षदा बोत्रे, मंजू चौधरी
बेस्ट ड्रेसअप: माही ठाकूर
मान्यवरांची उपस्थिती आणि संयोजन
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूजा अमोल पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. शीतल पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा मॅडम यांनी सर्व उपस्थित पाहुणे, पुरस्कारार्थी व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Advertisement Slot