शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी, विशाल उर्फ साकी गायकवाड वर पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Article link copied
पिंपरी चिंचवड : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील कथित सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या विशाल उर्फ साकी गायकवाड आणि त्याचा सहकारी प्रतीक गायकवाड यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पौंड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप रामभाऊ सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून पौंड पोलीस स्टेशनमध्ये विशाल उर्फ साकी गायकवाड आणि प्रतीक वाघमारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vo : सरकारी कामात अडथळा आणणे, लोकसेवकांना धमकी देणे आणि इलेक्टॉनिक माध्यमांचा गैरवापर करून बदनामी केल्याप्रकरणी पौड पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ ची कलम १३२, २२१, २९६, ३(५), ३५१(२) आणि ३५६ अन्वये कठोर गुन्हे दाखल केले आहेत. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दत्तात्रय गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Advertisement Slot