पुण्यातील जुनी सांगवीत दहीहंडीचा लोखंडी सांगाडा अंगावर पडून महिलेचा मृत्यू ; लेकाच्या भविष्यासाठी आईच्या मृत्यूनंतरही कुटुंबाची पोलिसांना तक्रार देण्यास नकार
Article link copied
पुणे (जुनी सांगवी):
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना पुण्याच्या जुनी सांगवी परिसरात घडली आहे. विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी कमानीचा सांगाडा काढण्याचे काम सुरू असताना, अचानक लोखंडी भाग डोक्यावर पडून ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथे विघ्नहर्ता मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव उत्साहात पार पडल्यानंतर उत्सवस्थळी उभारण्यात आलेला लोखंडी कमानीचा सांगाडा आणि साहित्याचे पिल्लर काढण्याचे काम सुरू होते. यादरम्यान अचानक लोखंडी सांगाड्याचा एक भारी भाग खाली कोसळला. दुर्देवाने याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या सलमा सलाउद्दीन पठाण यांच्या डोक्यावर हा लोखंडी भाग पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपस्थितांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
लेकाच्या भविष्यासाठी माऊलीची साद, कुटुंबाचा तक्रार देण्यास नकार
या संपूर्ण घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, मृत सलमा पठाण यांचा तरुण मुलगा याच विघ्नहर्ता मंडळात अत्यंत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो. आपल्या आईच्या अकाली मृत्यूमुळे हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, या दुःखाच्या डोंगराखालीही या कुटुंबाने दाखवलेली भूमिका मनाला चटका लावणारी आहे. मंडळातील इतर तरुण मुलांच्या भविष्याला कोणताही कायदेशीर धोका पोहोचू नये, म्हणून या दुर्दैवी कुटुंबाने पोलिसांकडे कोणतीही तक्रार नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इतकेच नव्हे, तर पोलिसांनी स्वतःहून (सुमो मोटो) याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये, अशी अत्यंत भावनिक विनंतीही कुटुंबीयांनी केली आहे.
एका बाजूला उत्सव संपल्यानंतर प्रशासकीय व आयोजकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, लोखंडी सांगाडे उतरवताना योग्य काळजी घेतली जात नसल्याचा संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, पोटच्या मुलाच्या भविष्यासाठी एका आईच्या मृत्यूनंतरही तिच्या कुटुंबीयांनी घेतलेली नरमाईची भूमिका पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आहेत. या दुर्दैवी घटनेने जुनी सांगवीत शोककळा पसरली असून पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत.

Advertisement Slot