

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे.वरळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाणांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. चव्हाण हे भाजपचे बारावे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शिंदे सरकार मध्ये काम केलं होत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होत.
रवींद्र चव्हाण यांचे काम –
चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 रोजी झाला आहे. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षणझाले आहे. 2002 मध्ये भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
- 2002 साली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात
- 2005 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले.
- 2007 मध्ये महापालिका स्थायी समितीचे सभापती होते .
- 2009 पासून, सलग चार वेळा आमदार होते .
- 2016 साली फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री झाले.
- 2016 ते 2019 या काळात बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी.
- 2022 साली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. दोन खात्यांची जबाबदारी.
- सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी.