

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. MCXवर आज सोन्याचे दर वधारले आहेत. पण चांदीच्या दरात मात्र हलकीशी घसरण झाली असून चांदी आज 105837 वर ट्रेड करताना दिसत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कालदेखील सोनं तब्बल 1 हजार रुपयांनी वधारले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 25 डॉलरने वाढून 3.350 डॉलरच्या आसपास पोहोचले होते. तर, चांदी 36 डॉलरवर स्थिरावली आहे देशांतर्गंत बाजारात, सोनं 490 रुपयांनी वाढलं असून 98 हजारांवर पोहोचलं आहे. चांदी 400 रुपयांनी वाढून 1,06,700 रुपयांवर पोहोचली आहे. कच्च तेल 1 टक्क्याने वाढून 67 डॉलरवर पोहोचले आहे. मागील सात व्यवहार सत्रांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार 99.9 टक्के शुद्धता असलेले सोन्याचा भाव सोमवारी 97.470 रुपये प्रती 10 ग्रॅमवर स्थिरावला होता. आज सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 98,890 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 90,650 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची वाढ होत असून 74,170 रुपयांवर पोहोचले आहे.