श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचा लढा यशस्वी: हक्काच्या पाण्यासाठी पुकारलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे
Article link copied
सोमवारी (दि. २२ जून) सकाळी १० वाजता ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर आणि कृष्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली खरातवाडीच्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत उपोषणास सुरुवात केली होती. या आंदोलनात सुभाष पंदरकर, दत्तात्रय पंदरकर, आनंता कदम, शिवाजी भोर, रंगनाथ कदम, सुभाष गलबले, गणपत गलबले, गणपत नलगे, अमोल पंदरकर, शिवाजी भापकर, युवराज भापकर, सुदाम रणसिंग व पिंटू नलगे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
गेल्या काही काळापासून शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून वंचित होते. हंगा डिओ (Hanga DO) ठिकाणी कायमस्वरूपी लोखंडी गेट बसवण्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नव्हता. तसेच, कुकडी डावा कालवा कार्यान्वित झाल्यापासून सुरू असलेली डीवाय ८ (DY 8) चारीची सब-मायनर १ काही शेतकऱ्यांनी परस्पर बंद केली होती, तर मायनर चारी क्र. ४५ पूर्णपणे नादुरुस्त आणि लिकेज झाल्यामुळे बंद पडली होती. या समस्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या निषेधार्थ हे शेतकरी एकवटले होते.
दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत सायंकाळी ५.३० च्या सुमारास कुकडी पाटबंधारे विभाग २, श्रीगोंदाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, उपअभियंता बबनराव वाळके आणि श्री. शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.
प्रशासनाने आंदोलकांना लेखी आश्वासन दिले की, हंगा डिओच्या लोखंडी गेटचे काम तातडीने पूर्ण केले जाईल. तसेच, मायनर १ आणि मायनर ४५ च्या दुरुस्तीबाबत यांत्रिकी विभागाला तत्काळ सूचना देण्यात आल्या असून, पुढील आवर्तनाचे पाणी या चाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना मिळेल, अशी खात्री दिली.
या आश्वासनानंतर कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे आणि उपअभियंता बबनराव वाळके यांच्या हस्ते सरबत घेऊन शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी पिंपळगाव खरातवाडीचे माजी सरपंच सूर्यजीत पवार, माजी उपसरपंच लक्ष्मण इथापे आणि नाना इथापे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि सकारात्मक निर्णयाबद्दल खरातवाडीच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Advertisement Slot