पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय अखेर ताथवडेत होणार
Article link copied
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या ताथवडे येथील वळूमाता केंद्र प्रक्षेत्रातील २० हेक्टर (अंदाजे ५० एकर) जागा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी देण्यास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या जागेचा तिढा सुटला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या तीन दिवसांत याबाबतचा शासन निर्णय जारी केला जाणार आहे.
राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली. त्यावेळी चिंचवड येथे महापालिका शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. निगडी येथील शाळेत मुख्यालय थाटण्यात आले. मोशी येथील नऊ एकर जागा आयुक्तालयासाठी मिळाली.
मात्र, मुख्यालयासाठी जागेची मागणी कायम होती. साडे सात वर्षापासून पोलीस आयुक्त कार्यालय, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसाठी निवासस्थाने, मुख्यालय, इतर अनुषंगिक कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या.
राज्याच्या पशुसंवर्धन व विकास विभागाचे ताथवडे येथे वळूमाता केंद्र प्रक्षेत्र आहे. या केंद्रातील २० हेक्टर जागा शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पोलीस आयुक्तालयाने प्रस्तावित केली. त्याला राज्य शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता दिली होती.
पिंपरी – चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या जागेसाठी आयुक्तालय प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आयुक्त विनयकुमार चौबे तसेच तत्कालीन पोलीस आयुक्तांनीही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे श्वान पथक, देहू येथे पोलिसांचे विश्रामगृह, आयुक्तालय प्रशासकीय इमारतीसाठी मोशी येथे नऊ एकर जागा, पोलीस अधिकारी निवासस्थानासाठी कस्पटेवस्ती येथे १५ एकर जागा, तसेच पोलीस मुख्यालयासाठीही २० हेक्टर जागा मिळाली आहे.
---------------

Advertisement Slot