

पुणे;चार चाकीतून येऊन सोन्याचांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गणेश अर्जुन पुरी (वय 33 रा. मांजरी पुणे, मुळ लातुर),रविसिंग शामसिंग कल्याणी ( वय 27 वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी, हडपसर, पुणे) , निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय 44 वर्षे रा. वांगणी, ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी आरोपींनी बंद घराचे लॉक तोडून रोख रक्कम व दागिने चोरून नेले.याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासी पथके मागावर पाठवली. हडपसर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार दिपक कांबळे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, यांनी फिर्यादी यांचे सोसायटी मध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीकरून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत फुटेज प्राप्त केले.पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील 800 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. त्या दरम्यान अधिक प्राप्त झाले फुटेज मधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले. संशयीत इसमांच्या प्राप्त फुटेजच्या आधारे अधिक तपासामधून आरोपींबाबत उपयुक्त माहीती हडपसर तपास पथकास मिळून आली.