…..तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो हातात घेऊन अपक्ष निवडणूक लढवू; भाजपचे इच्छूक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत
राहुल कलाटे यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेमुळे भाजप मध्ये धुसफूस
चिंचवड विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार राहुल कलाटे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे पिंपरी चिंचवड भाजपची धुसफूस समोर आली आहे.
परवा कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे चित्र दिसू लागले असताच भाजपा मधील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत थेट राहुल कलाटे यांचा भाजप पक्ष प्रवेशाला थेट विरोध केला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी आयात उमेदवार घेऊ नये असा इशारा भाजपच्या प्रभाग क्रमांक 25 मधील इच्छुक उमेदवारांनी दिला आहे.
राहुल कलाटे यांनी यापूर्वी चिंचवड विधानसभा निवडणूक देखील लढवल्या असून राहुल कलाटे हे विधानसभेसाठी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहून भाजपला आव्हान देखील उभे केले होते. तसेच राहुल कलाटे यांच्या भाजप पक्षाला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध असताना देखील त्याला पक्षात का घेण्यात येत आहे असा सवाल भाजपचे चिंचोली विधानसभा क्षेत्रातील स्थानिक पदाधिकारी विचारत आहेत. राहुल कलाटें यांचा जर भाजप पक्ष प्रवेश झाला तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो हातात घेऊन स्वतंत्रपणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला समोर जाऊ असा इशारा प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
