चालता बोलता न्यूज

Search Everything

काटकसरीच्या धोरणाला तिलांजली; महापौरांसाठी ३० लाखांची, तर आयुक्तांसाठी घेणार १९ लाखांची अलिशान गाडी 

Main Admin / Jun 18, 2026, 06:33 AM IST

Article link copied

पिंपरी (प्रतिनिधी): काटकसरीचे धोरण जाहीर केले असतानाहमहापालिकेने महापौरांसाठी ३० लाख रुपये आणि आयुक्तांसाठी १९ लाख रुपये किंमतीच्या अलिशान गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिक शिस्त आणि खर्चकपातीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप होत आहे. आयुक्त यांच्या कार्यालयीन कामाकाजासाठी सात आसन क्षमता असलेले अलिशान वाहन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी निविदा न काढता मे. टोयाटो किर्लोस्कर मोटार प्राय. लि. या कंपनीकडे शासकीय दराची मागणी केली होती. कंपनीने एका वाहनासाठी १८ लाख ८० हजार ७२१ अधिक जीएसटी असा दर दिला आहे. तर वाहन नोंदणी, विमा, वाहतूक खर्च, परिवहन विमा हे वाहन खरेदीच्या वेळी लागू होणार आहे. यासाठी निविदा न मागवता कंपनीला आगाऊ रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली. तर, महापौर यांच्यासाठी देखील नवीन इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यात येणार आहे. ते देखील थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडे दर मागविण्यात आले होते. कंपनीने महिंद्रा एक्सईव्ही ९५ या वाहनासाठी २९ लाख ३५ हजार ३६७ असा दर सादर केला आहे. तर यामध्ये देखील वाहन नोंदणी, विमा, वाहतूक खर्च, परिवहन विमा हे वाहन खरेदीच्या वेळी लागू होणार आहे. त्यामुळे हे वाहन सुमारे ३१ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. तर आयुक्तांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनाची किंमत २१ लाख रुपयांपर्यत असणार आहे. महापौर आणि आयुक्त यांच्या तब्बल ५० लाख रुपये वाहनखरेदीवर खर्च करण्यात येणार आहे. 

Advertisement Slot