लग्न अवघ्या काही दिवसांवर... पण काळाने केला घात, लोहगडावर फोटोच्या नादात २५ वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
Article link copied
लोणावळा : एका बाजूला लग्नाची धामधूम, जयपूरच्या महालात राजेशाही थाटात लग्नाची तयारी, विमानाचे बुकिंग... पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या एका तरुणाचा लोहगड किल्ल्यावर पाय घसरून दरीत पडल्याने अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय घडली नेमकी घटना ?
तरुणाचे नाव: केतन विशाल अग्रवाल (वय २५ वर्ष, रा. गहुंजे, पुणे)
तरुणाचे नाव: केतन विशाल अग्रवाल (वय २५ वर्ष, रा. गहुंजे, पुणे)
- लग्नाची तारीख : १४ जून रोजी विवाह निश्चित झाला होता.
- अपघाताचे कारण : केतन आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. तिथे फोटो काढत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.
घटनेची माहिती मिळताच लोणावळ्यातील 'शिवदुर्ग मित्र' आणि 'वन्यजीव रक्षक मावळ' संस्थेच्या बचाव पथकांनी तातडीने दरीत उतरून केतनचा मृतदेह बाहेर काढला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
निसर्गाचा आनंद घ्या, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी किंवा फोटो काढू नका. तुमच्या घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे. गड-किल्ल्यांवर फिरताना काळजी घ्या !
Advertisement Slot