चालता बोलता न्यूज

Search Everything

मंदिरांना लक्ष्य करणारे २ अट्टल चोरटे जेरबंद; सव्वा किलोचा चांदीचा मुकुट जप्त!

Main Admin / Jun 16, 2026, 11:58 AM IST

Article link copied

तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसी परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या मंदिर चोऱ्यांचा अखेर पर्दाफाश झाला आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मंदिरांना लक्ष्य करणारे दोन अट्टल चोरटे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातील मंदिरांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू होते. मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटी चोरून या चोरांनी परिसरात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, पोलिसांनी या चोरांना पकडण्यासाठी कंबर कसली.
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचा आधार घेतला. चोरट्यांचा माग काढत अखेर पोलिसांनी या दोन्ही अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या.
या धडक कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा झाला असून अनेक गुन्हे समोर आले आहेत.

Advertisement Slot