चालता बोलता न्यूज

Search Everything

पिंपरी-चिंचवड हादरले! पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

Main Admin / Aug 06, 2026, 02:47 PM IST

Article link copied

पिंपरी-चिंचवड हादरले! पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी-चिंचवड:
शहरातील ताथवडे परिसरातुन एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. ताथवडे येथील नामांकित पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाळेचा मुख्य लोखंडी गेट अचानक अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली असून स्कूल प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव संजय नागनाथ कांबळे (वय ५२ वर्षे) असे आहे. संजय कांबळे हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून प्रामाणिकपणे आपली ड्युटी बजावत होते.
ळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या इमारतीचा किंवा परिसराचा मोठा लोखंडी गेट अत्यंत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत होता असे बोलले जात आहे. ड्युटीवर असताना हा महाकाय लोखंडी गेट अचानक संजय कांबळे यांच्या अंगावर कोसळला. गेट इतका वजनदार होता की, त्याखाली दबल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या संपूर्ण घटनेसंदर्भात एक सुदैवी बाब म्हणजे, ज्या वेळी हा गेट कोसळला त्या वेळी आजूबाजूला शालेय विद्यार्थी नव्हते. जर हा गेट लहान मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडला असता, तर आणखी मोठी आणि भीषण दुर्घटना घडली असती. मात्र, यात विद्यार्थ्यांचे प्राण वाचले असले तरी स्कूल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप सुरक्षारक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, सुरक्षारक्षक संजय कांबळे यांच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी स्कूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुरक्षारक्षकाच्या जीवाला कारणीभूत ठरलेल्या संबंधित स्कूल प्रशासनावर आणि जबाबदार व्यक्तींवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा किंवा योग्य धाराओंखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement Slot