चालता बोलता न्यूज

Search Everything

पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडून राजमाता जिजाऊ आणि महाराणा प्रताप यांना अभिवादन; विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली 

Main Admin / Jun 18, 2026, 01:59 AM IST

Article link copied


पिंपरी-चिंचवड: स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासातील या थोर व्यक्तिमत्त्वांना वंदन करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता जिजाऊंना वाहिली आदरांजली
पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी भोसरी येथील लांडेवाडी येथे जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
महाराणा प्रताप जयंती उत्सवात सहभाग
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा घिसाडी (लोहार) समाज संस्थेच्या वतीने पुणे (बिबवेवाडी) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची आरती करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. महाराणा प्रताप यांची मिरवणूक काढून हा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. लोहार समाजाच्या या उत्सवात सहभागी होऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. 
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी सरचिटणीस युवराज पवार, हरीश डोळस, हिराचंद जाधव, महेश नांद्रे आणि कुणाल भोसले हे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement Slot