पिंपरी-चिंचवड 'विकास आराखडा नियोजन समिती' जाहीर
Article link copied
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतीक्षित प्रारूप विकास आराखड्यावरील (DP) नागरिकांच्या सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी अखेर 'नियोजन समिती'ची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक संदीप कस्पटे आणि सारिका गायकवाड यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली. नियोजन समितीचे स्वरूप आणि अधिकार कायद्यातील तरतुदींनुसार, महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांनी नोंदवलेल्या हरकतींवर ही समिती सुनावणी घेईल. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, समिती आवश्यक त्या बदलांची शिफारस थेट नियोजन प्राधिकरणाकडे करणार आहे. एकूण ७ सदस्यांची समिती: स्थायी समिती सदस्य (३): अभिषेक बारणे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड. शासन नियुक्त तज्ज्ञ अधिकारी (४): प्रकाश भुक्ते (निवृत्त सहसंचालक, नगररचना) दत्तात्रय पवार (निवृत्त उपसंचालक) उत्तरेश्वर लोंढे नरसू शिंदे (अभियांत्रिकी अधिकारी) भोसरी, चिंचवडला संधी; पिंपरीला डावलले! समितीवरील नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत मोठी रस्सीखेच सुरू होती. या निवडीमध्ये राजकीय वर्चस्व राखण्यासाठी आमदार आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मोठे प्रयत्न केल्याचे दिसून आले. चिंचवड आणि भोसरीच्या नगरसेवकांना संधी मिळाली. तर या समितीच्या नियुक्तीत पिंपरी विधानसभा मतदारसंघाला डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
Advertisement Slot