पिंपरी चिंचवड – महिलांवरील अन्यायविरोधात होणाऱ्या घटनाच्या निषेधार्थ उदया पिंपरी चिंचवड मधे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे
शक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी तसेच फास्टट्रॅक कोर्टद्वारे दोषींना त्वरित कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी याठिकाणी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी
सकाळी १० ते ५ पर्यँत करण्यात येणार आहे.
समाजात लहान बालिका, तरुणी आणि महिलांवर अत्याचार, छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांची संख्या वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे. अनेक प्रकरणांमध्ये न्याय मिळण्यास वर्षानुवर्षे विलंब होत आहे त्यामुळे शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कारण्यात यावी त्याच बरोबर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा दयावी या प्रमुख मागण्या आहेत.
या उपोषणामध्ये: दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर
तसेच मोठ्या संख्येने तरुणी, महिला आणि कार्यकर्त्या सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
