पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या मतदार याद्या २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर प्रारूप यादीवर सूचना व हरकत नोंदवण्यासाठी फक्त ७ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकूण ३२ प्रभाग असून या प्रभागामध्ये जवळपास ५५ हजार ते ६५ हजार पर्यंत मतदारांची संख्या आहे. अनेक प्रभागांमध्ये दुबार, तिबार मतदारांची संख्या आहे. तसेच काही ठिकाणी मृत व्यक्तींची नावे देखिल आहेत, आणि काही प्रभागांमध्ये काही मतदारांची नावे मूळ प्रभाग सोडून इतरत्र प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या याद्या तपासून स्थलांतरित मतदार शोधणे व त्यावर सूचना हरकत नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला वेळ हा पुरेसा नाही, निवडणूक आयोगाने २७ नोव्हेंबर पासून आणखी २१ दिवसाचा कालावधी वाढवून द्यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तसेच प्रशासकb श्रावण हर्डीकर यांच्याकडे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
