पिंपरी चिंचवड
कुख्यात गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार, पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तिन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

सोमाटणे टोल नाक्यावर चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने एक राऊंड गोळीबार केला आहे. रावेत आणि हिंजवडी येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे एका खाजगी कार मधून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने मावळच्या दिशेने जाणार आहेत अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमाटणे टोल नाक्या जवळ सापळा रचून सनीसिंग पापासिंग दुधानी, जलसिंग राजपूतसिंग दुधानी आणि मनीष बाबुलाल कुशवाह या तीन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून, त्याच्या ताब्यातून एक चोरीची कार, दोन देशी बनावटीचे पिस्टल, सात जिवंत काडतुसे, धार दार शस्त्र, चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण जवळपास 8 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी वेळा ठोकलेल्या आरोपी पैकी शनिशिंग पापा सिंग दूध आणि जलसिंग राजपूत सिंग दुधानी हे दोन आरोपी मोकक्क्या च्या गुन्ह्यातील आरोपी असून या आरोपीवर जवळपास 70 पेक्षा जास्त चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आज पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
