चालता बोलता न्यूज

Search Everything

Breaking
पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त  चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त  चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता

बालभारती ची  पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वितरणाला सुरुवात

Main Admin / Jun 12, 2026, 01:12 PM IST

Article link copied



पिंपरी 

‘बालभारती’कडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आलेली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत शुक्रवारपर्यंत (दि.१२) ही पुस्तके शाळेत विनामूल्ये वितरीत केली जात आहेत. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत आहे.

पुस्तकांच्या वितरणासाठी आकुर्डीतील वसंतदादा पाटील महापालिका शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा, पिंपरी वाघेरे ही वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, शासकीय शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पाठ्यपुस्तक असावे, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

------------

खासगी शाळांबाबत दुजाभाव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने महानगरपालिका शाळांना विभागवार पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचे व्यवस्थित नियोजन केले आहे. मात्र खासगी शाळांसाठी ना गाव, ना विभाग, ना केंद्र अशी परिस्थिती असल्याची तक्रार एका खासगी शाळेतील शिक्षकांनी केली. शिक्षण विभागाने खासगी शाळांना पाठवलेल्या वेळापत्रकात १२ जूनमध्ये पाठ्यपुस्तके वितरीत करण्याचा तारखा दिल्या आहेत. पण, केंद्राची नोंद केलेली नाही.

----------------

खासगी अनुदानित शाळांमधील स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्ये पाठ्यपुस्तके वितरीत केली जाणार नाहीत, याची संबंधित शाळांनी नोंद घ्यावी. सर्व मुख्याध्यापकांनी नियोजित वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तकांचा ताबा घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत वितरण करावे.

- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

Advertisement Slot