चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या
Article link copied
चिंचवडमधील एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील मदर टेरेसा उड्डाणपुलाखाली असलेल्या बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर आज सकाळी धक्कादायक घटना घडली. सिकंदर मोहम्मद शेख (वय ४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी अंदाजे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी जिन्याजवळील लाईटच्या केबलला गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी रुग्णालयाशी संबंधित कागदपत्रांची फाईल आढळून आली असून, ते काही तणावाखाली होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.
Advertisement Slot