चालता बोलता न्यूज

Search Everything

लोहगड किल्ल्यावर केतन अगरवालचा खून; प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पत्नीचाच कट उघड

Main Admin / Jun 23, 2026, 08:45 AM IST

Article link copied


पुणे ग्रामीण पोलिसांनी एका अत्यंत धक्कादायक खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असून लोहगड किल्ल्यावरून पडून केतन विशाल अगरवाल (वय २५) याच्या मृत्यूची घटना ही अपघात नसून नियोजनबद्ध घातपात असल्याचे समोर आले आहे. १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला केतनचा मृतदेह आढळला होता, तेव्हा त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने केतनचा पाय घसरल्यामुळे तो किल्ल्यावरून खाली पडल्याची खोटी माहिती दिली होती. मात्र, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून समांतर सखोल चौकशीचे आदेश दिल्यानंतर प्रकरणाचे सत्य बाहेर आले. तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन बाबुलाल चौधरी (वय २२) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. सियाचे लग्न केतनशी ठरले होते, मात्र तिला हे लग्न मान्य नव्हते आणि केतन त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होता. या कारणावरून सिया गोयल हिने कट रचून केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेले आणि तिथे प्रियकर चेतन चौधरी यास बोलावून घेऊन, त्याने केतनला किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये २३ जून २०२६ रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Advertisement Slot