चालता बोलता न्यूज

Search Everything

लोणावळ्यातील A1 चिक्कीला मेवाडच्या महाराजांची खास भेट; परंपरा आणि राजेशाही वारशाचा अनोखा संगम

Main Admin / Aug 29, 2026, 07:27 AM IST

Article link copied

लोणावळ्यातील A1 चिक्कीला मेवाडच्या महाराजांची खास भेट; परंपरा आणि राजेशाही वारशाचा अनोखा संगम
लोणावळा:
लोणावळ्याची जगप्रसिद्ध 'A1 चिक्की' आता केवळ सर्वसामान्यांच्याच नव्हे, तर थेट राजघराण्यांच्याही आवडीची ठरली आहे. मेवाडच्या १,५०० वर्षांच्या ऐतिहासिक राजघराण्याचे ७७वे वंशज डॉ. लक्ष्याराज सिंह मेवाड यांनी नुकतीच लोणावळ्यातील A1 चिक्कीच्या स्टोअरला धावती भेट दिली.
या विशेष प्रसंगी A1 चिक्कीचे संचालक रमेश व्यास यांनी डॉ. लक्ष्याराज सिंह मेवाड यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांमध्ये दिलखुलास संवाद झाला. एका बाजूला मेवाडचा गौरवशाली राजेशाही इतिहास आणि दुसऱ्या बाजूला लोणावळ्याची अस्सल चिक्की संस्कृती, असा एक सुंदर मिलाफ या भेटीत पाहायला मिळाला.
डॉ. लक्ष्याराज सिंह मेवाड यांनी यावेळी येथील चिक्कीच्या पदार्थांची चव घेत तिथल्या पारंपारिक वारशाबद्दल आणि गुणवत्तेबद्दल आदर व्यक्त केला. दीड हजार वर्षांच्या राजघराण्याचा वारसा लाभलेल्या महाराजांच्या या आगमनामुळे लोणावळ्यात, हा क्षण त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला आहे.
ही केवळ एक व्यावसायिक भेट नसून परंपरा, प्रतिष्ठा आणि आदरातिथ्याचा एक खास सोहळा ठरला आहे...


Advertisement Slot