चालता बोलता न्यूज

Search Everything

Breaking
पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त  चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त  चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता

पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Main Admin / Jun 12, 2026, 01:54 PM IST

Article link copied


पिंपरी प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पिंपळे गुरव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम तीव्र केली असून, आठ बांधकामधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ३९७ अ (१) व ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील विविध भागांमध्ये परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या बांधकामांची पाहणी करण्यात आली. यामध्ये लक्ष्मीनगर, कृष्णराज कॉलनी, तुळजाभवानी नगर, गुलमोहर कॉलनी, पंचरत्न नगर आणि गावठाण परिसरातील बांधकामांचा समावेश आहे. संबंधितांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्याने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

कारवाई झालेल्या बांधकामांचे क्षेत्रफळ अंदाजे ५० ते १०० चौरस मीटर दरम्यान असून, विजय मानकर, अनिल जाधव व जे. एस. काझी, इरफान व प्रकाश कांबळे, समीर दिवेकर व मारुती पलांडे, स्वप्नील बहिरट व प्रणव गायकवाड, जाधव व धुमकर, कैलास सूर्यकांत धनवटे तसेच बुरुड व सौरभ सुतार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना विनापरवाना बांधकामे न करण्याचे आवाहन केले असून, नियमबाह्य बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी गुन्हे दाखल करण्याबरोबरच पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे अधिका-याकडून सांगितले.

------

Advertisement Slot