पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Article link copied
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरदस्तीच्या चैन चोरीचा छडा लावत पोलिसांनी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल १२,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक ०९/०६/२०२६ रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुखापत करून जबरदस्तीने चोरून नेली होती.याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २१५/२०२६, भा.न्या.सं.क. ३०९ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. दिनांक १३/०६/२०२६ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई अमर कदम यांना या गुन्ह्यातील आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील निरगुडी येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) वैष्णव शरद कदम (वय २० वर्षे, रा. मु.पो निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) २) सचिन जालिंदर कदम (वय ४२ वर्षे, रा. मु.पो निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) ३) विजय ज्ञानेश्वर कदम (वय ३३ वर्षे, रा. मु.पो निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे. ४,९५,००० रुपये किमतीची ३३.८१० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन. गुन्ह्यात वापरलेली किंवा संबंधित असणारी ८,००,००० रुपये किमतीची चारचाकी गाडी (फोर व्हिलर) एकूण जप्त मुद्देमाल: १२,९५,००० रुपये. ही उल्लेखनीय कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणारे पथक: मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, स.पो.नि. पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पो.उप.निरी. महेश खांडे, तसेच पोलीस अंमलदार गणेश हिंगे, नितीन लोखंडे, अमर कदम, चंद्रकांत गडदे, सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, हर्षद कदम, मोहसिन आत्तार, विनोद वीर, गणेश सावंत आणि औंदुबर रौंगे यांनी ही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
Advertisement Slot