पुण्यात तिरंगा सन्मान यात्रेचा जल्लोष; मावळ आणि पिंपरी-चिंचवडमधून भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
Article link copied

पुणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यातील एफसी रोड परिसरात भव्य तिरंगा सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या यात्रेला मावळच्या ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळ आणि पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले. हातात तिरंगा आणि मनात देशभक्तीची भावना घेऊन कार्यकर्त्यांनी या यात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्यासह हजारो नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन यात्रेत सहभाग घेतला.
यावेळी पुण्याच्या रस्त्यांवर तिरंग्यांची आकर्षक सजावट आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
तिरंगा सन्मान यात्रेमुळे पुण्यात राष्ट्रप्रेमाचा जल्लोष पाहायला मिळाला असून, मावळ आणि पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती या यात्रेचे विशेष आकर्षण ठरली
#pune tiranga rally
#tiranga sanman yatra
#har ghar tiranga
#pune news
#pune latest news
#mawal news
#pimpri chinchwad news
#bjp pune
#bjp mawal
#bjp pimpri chinchwad
#devendra fadnavis
#ravindra chavan
#chandrakant patil
#shankar jagtap
#fc road pune
#tiranga rally pune
#maharashtra news
#pune political news
#independence day
#tiranga yatra
Advertisement Slot