चालता बोलता न्यूज

Search Everything

Breaking
पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त  चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ३ आरोपींना अटक करून १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त  चिंचवडमध्ये बीआरटी बसथांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर व्यक्तीची आत्महत्या पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा दणका; आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता

पुरस्थिती हाताळण्यासाठी आपदा मित्रांची नियुक्ती; ३३ लाखांचा खर्च

Main Admin / Jun 12, 2026, 01:46 PM IST

Article link copied



पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, पूरस्थिती, दुर्घटना तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनासाठी आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तीन महिन्यांसाठी ३३ लाख रुपयांचा खर्च स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आला आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक, गतिमान आणि सक्षम होण्यासाठी आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चासा स्थायी समितीने मान्यता दिली. याअंतर्गत शासनमान्य संस्थांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले आपदा मित्र, राज्य अग्निशमन दल तसेच नागरी संरक्षण दलातील प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किमान ५० अनुभवी आपदा मित्र स्वयंसेवकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
 
या स्वयंसेवकांना कामगार कल्याण विभागाकडील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन दरानुसार मानधन अदा करण्यात येणार आहे. एका कर्मचाऱ्याला २२ हजार ४८५ रुपये प्रती महिना अने वेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी महिन्याला ११ लाख २४ हजार २५० रुपये खर्च असून तीन महिन्यासाठी ३३ लाख ७२ हजार ७५० रुपयांचा खर्च होणार आहे. त्याला स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी मान्यता दिली. हे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने विविध आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देणे, बचावकार्यामध्ये मदत करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, पूरपरिस्थितीमध्ये सहाय्य करणे, आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

Advertisement Slot