देऊळ बंद' चित्रपटाचा २ हजारांहून अधिक महिलांनी घेतला अनुभव; अनुप मोरे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम.
Article link copied
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात आज एक उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले. चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने २ हजारांहून अधिक महिलांसाठी 'देऊळ बंद' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. महिलांना दर्जेदार मनोरंजनासोबतच सामाजिक आशय असलेला चित्रपट पाहता यावा, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला होता.
या विशेष कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रविण तरडे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देताना माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे म्हणाल्या की, "आमच्या फाउंडेशनतर्फे समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो. महिलांसाठी आयोजित या चित्रपट प्रदर्शनाला त्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तो पाहून आनंद झाला." त्यांनी या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले.
भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले, "युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या प्रभागात नेहमीच सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. याच परंपरेनुसार, आज महिलांसाठी हा खास शो आयोजित केला होता. शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांचा हा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे."
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महिलांनी फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील महिलांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Advertisement Slot