दिवंगत कामगार राहुल साबळे यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द
Article link copied
पिंपरी-चिंचवड:
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील 'ह' प्रभाग क्षेत्रीय कार्यालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढण्याचे काम सुरू असताना, उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगार स्व. राहुल साबळे यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
या दुर्दैवी दुर्घटनेमुळे साबळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या उद्देशाने कै. राहुल यांच्या पत्नी संगीता राहुल साबळे तसेच वडील विठ्ठल महादू साबळे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राहुल यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणतीही आर्थिक मदत भरून काढू शकत नाही, मात्र संकटकाळात कुटुंबाला आधार देणे आणि त्यांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या दुःखद प्रसंगी स्व. राहुल साबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, भविष्यातही या कुटुंबीयांना कोणत्याही अडचणीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Advertisement Slot