
पिंपरी चिंचवड़ – राज्याची मातृभाषा मराठी असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चक्क इंग्रजी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मोठ मोठ्या होर्डिंग्ज पिंपरी चिंचवड शहरात झळकल्या आहेत.

ही प्रॉमिसेस, ही डिलिव्हर, ॲक्शन स्पीक्स, वर्क्स इन्स्पायर, हॅपी बर्थडे टू द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड महाराष्ट्र प्रोग्रेस बेस्ट विशेष फ्रॉम भाऊसाहेब भोईर संतोष बारणे, अभयशेठ मांढरे अँड फ्रेंड सर्कल अशा आशयाच्या होर्डिंग पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी झळकल्या आहेत. या होर्डिंग वर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकारी भाऊसाहेब होईल, संतोष बारणे आणि अभय शेठ मांढरे यांचे फोटो देखील आहेत.