

पिंपरी चिंचवड : रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून केबल टाकणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे एक मोठ झाड पीएमपीएमएल बस वर कोसळल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. बसवर झाड कोसळल्याने जवळपास पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड ते आकुर्डी दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. शेवाळवाडी वरून निगडीला जाणाऱ्या प्रवासी पीएमपीएल बस वर हे मोठ झाड कोसळल आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम सुरू आहे. केबल टाकण्यासाठी खोदकाम करत असताना झाडाच्या खोडा भवतालची माती मोठ्या प्रमाणात काढल्यामुळे हा अपघात घडला आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून झाड हटवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली असून झाड हटवण्याचे काम सुरु आहे.