

पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा नेक्सॉन कार चालकाने दुचाकी वर जाणाऱ्या दोन तीन वाहन चालकांना जोरदार धडक दिली आहे. या धडके दोन-तीन दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत. दापोडी येथील हॅरीश पुलाजवळ ही अपघाताची दुर्घटना घडली आहे. नेक्सॉन कार चालक भरधाव वेगात पिंपरी चिंचवड कडून पुण्याच्या दिशेला जात असताना त्याचं कार वरील नियंत्रण सुटल्याने त्याने दोन-तीन वाहन चालकांना मागून जोरदार धडक दिली आहे. या घटनेत दोन-तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने जखमींना पुढील उपचारासाठी वाय सी एम रुग्णालयात पाठवला आहे. तर कार चालक आणि त्याच्यासोबत कार मध्ये असलेल्या एका तरुणाला दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.